गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा बोलबाला आहे. ब्लॉगसारखं माध्यम आता सर्वांनाच उपलब्ध आहे. कार्यालयीन गरजेव्यतिरिक्त आपण स्वतःसाठीही अनेकदा लिहीत असतो. ते लेखन असंच कुठं कुठं सुटं पडून असतं. त्या लेखनालाही एक व्यासपीठ मिळावं म्हणून मी मे २०१३ मध्ये स्वतःचा ब्लॉग सुरू केला. 'ब्रह्मेवाक्य' असं चांगलं शीर्षकही सुचलं. खरं तर हे शीर्षक सुचलं म्हणून ब्लॉग सुरू केला, असंही म्हणता येईल. माझा मित्र आणि लोकप्रिय ब्लॉगर आशिष चांदोरकर यानंही ब्लॉग लिहिण्यासाठी मला प्रेरणा दिली... आता गेल्या चार-पाच वर्षांत या ब्लॉगवर १७० च्या आसपास लेख अपलोड केले आहेत. यातले बरेचसे आधी प्रसिद्ध झालेले लेख असले, तरी खास ब्लॉगसाठीही लिखाण केलंच. विशेषतः २०१४ नंतर मी सिनेमा परीक्षण अंकातून करणं थांबविल्यावर लोकाग्रहास्तव सिनेमावर ब्लॉगवर परीक्षणं लिहीत गेलो. ब्लॉगचं वैशिष्ट्य म्हणजे इथं जगभरातून प्रतिसाद येतो... मला ब्लॉगवर लिहिणं आवडतं... इथं लिहीत राहीनच...
वृत्तसंपादक,
महाराष्ट्र टाइम्स‚ पुणे आवृत्ती
टाइम्स हाउस‚ ५७७‚ शिवाजीनगर‚
नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोड 〈फर्ग्यसन रोड)‚ पुणे- ४